खळबळजनक : एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आले अन्.......
खळबळजनक : एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आले अन्.......
img
DB
चाळीसगाव : एटीएममध्ये पैसे भरणा करण्यासाठी आलेल्या तीन जणांनी तब्बल 65 लाख रुपये लांबवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयीतांकडून वीस लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या संशयीतांकडून सुमारे 20 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. तीनही संशयित नाशिक येथील सिक्यूर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या खासगी कंपनी मार्फत एटीएम मशीनमध्ये रक्कम भरण्याचे काम करतात. मात्र पैसे भरत असताना त्यांनी तब्बल 65 लाख रुपये लांबवल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या तीनही जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group