धक्कादायक घटना : 'या' कारणातून शाळेच्या मैदानावरच मारहाण, नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
धक्कादायक घटना : 'या' कारणातून शाळेच्या मैदानावरच मारहाण, नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
जळगावमधील आर आर विद्यालयाच्या मैदानावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मैदानावर खेळताना नववीतील विद्यार्थ्याचा  मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात म्हणून वाटली. मात्र पोलीस तपासानंतर घटनेचा धक्कादायक खुलासा झालाय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कल्पेश इंगळे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे.  ही घटना शुक्रवारी  घडली आहे. कल्पेश इंगळे आणि त्याच वर्गातील एक अल्पवयीन विद्यार्थी यांच्यात खेळाच्या वेळी वाद झाला. हा वाद पुढे कट्टरतेत रूपांतरित झाला आणि मारहाणीच्या घटनेत बदलला. कल्पेशच्या अंगावर जखमांचे पुरावे मिळाले आणि त्याच्या मृत्यूचे कारण मारहाण असल्याचे स्पष्ट झाले.

यासंदर्भात, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मारहाणीची गंभीर तक्रार दाखल करण्यात आलीय. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपी अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 22 तासानंतर आज मयत विद्यार्थ्याचं शवविच्छेदन करून त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापनाविरुद्ध देखील कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी मयत कल्पेश याच्या पालकांनी केली आहे. शाळा व्यवस्थापनाची देखील चौकशी केली जाणार असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group