भीषण अपघात : अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
भीषण अपघात : अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू
img
Dipali Ghadwaje
जळगावमध्ये जुना निमखेडी रोडवर ऑटो रिक्षाचा भयंकर अपघात झाला. भरधाव वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्यामुळे अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ऑटो रिक्षामधील दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर जळगावमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार  , ऑटो रिक्षाच्या अपघातात ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.  अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

कसा घडला अपघात ? 
 
जळगावमध्ये भोई कुटुंबाचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. त्यासाठीचं साहित्य तसेच माल तयार करण्यासाठी शिवदे बंधू पहाटे चार वाजता रिक्षाने जात होते. यादरम्यान निमखेडी रोडवर अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षा चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ऑटो चालकाचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे. 

 ऑटोचा अपघात झाल्यानंतर जुना निमखेडी रोडवर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत वाहतूक सुरळीत केले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आले आहे. सख्ख्या भावांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे जळगावमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group