जळगाव रेल्वे दुर्घटना ! आगीच्या अफवेमुळे ७ ते ८ जणांचा मृत्यू, काहींचे शीर धडावेगळे झाले
जळगाव रेल्वे दुर्घटना ! आगीच्या अफवेमुळे ७ ते ८ जणांचा मृत्यू, काहींचे शीर धडावेगळे झाले
img
दैनिक भ्रमर
 जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ  संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, आग लागल्याची अफवा पसरताच 30 ते 35 जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यातच समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात अनेक जण जखमी झाले असून, काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

 या दुर्घटनेमध्ये ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळी रुळावर अत्यंत भयानक असं दृश्य आहे. काही जणांचे शीर धडावेगळी झाली आहे तर काही जणांचे दोन तुकडे झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकाच्या जवळ ही घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं येत होती. परधारे गावाजवळ पोहोचली असता एका बोगीतून चाकाखालून धूर येत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे आग लागली अशी अफवा पसरली. त्यामुळे लोकांना रेल्वे रुळावर उड्या मारल्या. पण त्याचवेळी बंगळुरू एक्स्प्रेस सुसाट वेगात आली. त्यामुळे काही प्रवाशी हे रेल्वेखाली सापडले. त्यामुळे काही प्रवाशांचे शीर धडा वेगळे झाले. तर काही जणांचे दोन तुकडे झाले. काही जणांनी पुलावरून खाली उड्या मारल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group