धक्कादायक : प्रचाराला निघालेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला गाडीतच हृदयविकाराचा झटका
धक्कादायक : प्रचाराला निघालेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला गाडीतच हृदयविकाराचा झटका
img
DB
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने  त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 



 प्रभाकर आप्पा सोनवणे हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. प्रभाकर सोनवणे हे जळगाव येथून चोपड्याला प्रचारासाठी जात असताना ममुराबाद गावाजवळ त्यांना वाहनात हृदयविकाराचा झटका आला. घटनेनंतर तातडीने कार्यकर्त्यांनी त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.



याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , रुग्णालयात त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली असून दोन ब्लॉकेज निघाल्याची माहिती मिळाली आहे. प्रभाकर सोनवणे यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना पाहण्यासाठी नातेवाईक मित्र परिवारासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे.

प्रभाकर सोनवणे हे शिवसेना ठाकरे गटाचे चोपडा मतदारसंघाचे उमेदवार असून ठाकरे गटाच्या शेवटच्या यादीत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाकर सोनवणे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group