सुषमा अंधारे यांच्या आरोपानंतर... जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशीचा आदेश; नेमका आदेश काय ?
सुषमा अंधारे यांच्या आरोपानंतर... जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा चौकशीचा आदेश; नेमका आदेश काय ?
img
Jayshri Rajesh
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जळगावात सभा घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या सभेनंतर जळगावातील आदित्य लॉन्स येथे शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत कथित पैसे वाटपाच्या प्रकाराची जळगावच्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जळगावचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना या प्रकरणाची चौकशी करण्याबाबतचं पत्र उपजिल्हाधिकारी यांनी दिलं आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावच्या आदित्य लॉन्स येथे बैठक पार पडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर आदित्य लॉन्स येथे पैसे वाटप होत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पैसे वाटप केल्याच्या प्रकाराबाबतचा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच त्याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे. चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

उमेदवारांकडून साडी वाटप, नथनी तसेच कपडे वाटपाबाबत कुठल्याही शिक्षकाची तक्रार आलेली नाही. पैठणी साडी, महागडे कपडे तसेच नथ वाटप झाल्याबाबत शिक्षकाची तक्रार आल्यास त्यानुसार त्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करणार असल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची असल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे नेमके आदेश काय?

आदित्य लॉन्स येथे  22 जूनला झालेल्या सभेसाठी परवानगी घेण्यात आली होती का? तसं नसल्यास नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.
या चित्रीकरणात दिसून येणाऱ्या इसमांची शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांच्यामार्फत ओळख पटवावी.

 झालेल्या चित्रीकरणाचे फुटेज तात्काळ ताब्यात घेण्यात येऊन आणि सदर चित्रीकरणाची भरारी पथकामार्फत चौकशी करावी,पैसे घेऊन जात असल्याबाबतचे अभिलेख जप्त करण्यात यावे. अभिलेख गहाळ झाल्यास भारतीय पुरावा अधिनियम 1872 अन्वये आवश्यक ती कार्यवाही करावी.
इतर बातम्या
Join Whatsapp Group