दुर्दैवी! अवकाळी पावसामुळे घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात वाचला
दुर्दैवी! अवकाळी पावसामुळे घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात वाचला
img
Dipali Ghadwaje
गेल्या आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पावसासह वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आंबा पाणी गावाजवळील थोर पाणी परिसरात एक घर कोसळलं. या घटनेत घरात झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार , मृतांमध्ये पती-पत्नी, लहान मुलगी आणि वृद्ध महिलेचा समावेश आहे. सुदैवाने या घटनेतून ४ वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचावला आहे.  मात्र, या घटनेत अख्खं कुटुंबच संपलं आहे. यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

दरम्यान स्थानिकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत

नेमकं काय घडले? 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबीय रविवारी रात्रीचे जेवण करून घरात झोपले होते. त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अचानक घर कोसळलं. या घटनेत घरातील चौघेजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. नशीब बलवंत्तर असल्याने या घटनेत ४ वर्षांच्या चिमुकल्याचे प्राण वाचले. मात्र, या घटनेत अख्खं कुटुंबच संपलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group