दारु पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या रागातून मुलाने केला बापाचाच खून
दारु पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या रागातून मुलाने केला बापाचाच खून
img
दैनिक भ्रमर
दारु पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरुन बाप-लेकामध्ये वाद झाला. या वादातून मुलाने चक्क आपल्या बापालाच संपवल्याची धक्कादायक घटना जळगावातील पळासखेडा येथे घडली. या घटनेत मुलाने धारदार शस्त्राने वार करुन आपल्या बापाची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. 

बाजीराव राजाराम पवार असे मयत पित्याचे नाव असून ते जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील रहीवासी होते. तर सुमित बाजीराव पवार (वय 32) असे खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. दरम्यान, दोघ बाप-लेकात दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरुन जोरदार वाद झाला. हा वाद विकोप्याला जात दोघांमध्ये हानामारी झाली. यात रागाच्या भरात मुलगा सुमित याने त्याच्या वडिलांवर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. 

गुरुवार दि. 16 मे रोजी दुपारी 4 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. रागाच्या भरात सुमितने वडिलांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या घटनेत वडील रक्तबंबाळ झाल्याचे लक्षात येताच त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने रक्तबंबाळ अवस्थेतील आपल्या बापाला रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत उशीर होत त्याच्या वडिलांना मृत्यूने कवटाळले होते. त्यानंतर मुलगा सुमीतने पोलिसांसमोर शरण जात वडिलांच्या खुनाची कबुली दिली.

दरम्यान, वडिलांचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला, तेव्हा मारेकरी मुलगा देखील सोबत होता. या ठिकाणी घटना ऐकून उपस्थित डॉक्टरांसह कर्मचारी देखील चक्रावून गेले. त्यानंतर जामनेर पोलीस रुग्णालयात दाखल होत संशयित आरोपी सुमित पवार याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group