जळगावात अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
जळगावात अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा
img
दैनिक भ्रमर
बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील  घडामोडींना वेग आलं आहे. अनेक दावे आरोप , प्रत्यारोप सुरु असताना जळगावातून मोठी बातमी समोर आली आहे.  जळगावात अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. 

उद्याच्या  निवडणुकीच्या निकालाआधीच जळगावात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. जळगावातील पिंप्राळामध्ये अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक अतुल बारी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कुलभूषण पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीवरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर मोठ्या वादात झालं आणि या वादाचं पर्यावसन मारहाणीत झालं. या हाणामारीत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी जमाव पांगवला आहे. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळ गाठून भाजप कार्यकर्त्यांची चर्चा करत माहिती जाणून घेतली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणाची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. याप्रकरणी तक्रार न आल्यास पोलीस सुमोटो गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, मतमोजणीच्या आदल्या दिवशी झालेल्या राड्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group