'या' गावात शिवजयंती मिरवणूकीवर दगडफेक ; ३ जण जखमी
'या' गावात शिवजयंती मिरवणूकीवर दगडफेक ; ३ जण जखमी
img
दैनिक भ्रमर
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली येथे शिवजयंती मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाल्याने गुरुवारी मोठा तणाव निर्माण झाला आहे. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती असून घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी ५-६ संशयितांना देखील ताब्यात घेतले आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार दि. २८ मार्च रोजी सायंकाळी इंदिरा नगर येथून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक वराड गल्ली येथे आली असता तेथे काही काळ ढोलताशे बंद करण्यात आले. अचानक अज्ञात समाजकंटकांनी मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक सुरु केली. दगडफेकीने मोठी तारांबळ उडाली आणि तणाव निर्माण झाला. नागरिकांच्या अंगावर आणि काहींच्या घरावर देखील दगड पडले.

एनआयएला मोठे यश! रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटाच्या सूत्रधाराला अटक

घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (४५), विशाल दिलीप पाटील (२५) यांच्यासह काही पोलीस कर्मचारी आणि ५ ते ६ नागरिक जखमी आहेत. घटनास्थळी अजूनही तणावाचे वातावरण असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे पोहोचले असून माहिती घेत आहेत. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु असून संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group