शिवजयंती निमित्त उद्या शहरातील वाहतूक मार्गात बदल;
शिवजयंती निमित्त उद्या शहरातील वाहतूक मार्गात बदल; "असे" आहेत पर्यायी मार्ग
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात गणेशोत्सवाप्रमाणेच शिवजयंती उत्सव तथा शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो या निमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येते, सोमवार दि. १९ रोजी दुपारनंतर ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. याकरिता शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
   
   छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात भद्रकाली परिसरातून मुख्य मिरवणुकीसह पाथर्डी फाटा, पंचवटी आणि नाशिकरोडला भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने गर्दी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक मार्गांत बदल  करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. १९) दुपारी १२ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे बदल लागू असतील आणि महत्त्वाच्या ठिकाणी बॅरकेडिंग करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली.
 
   नाशिकरोड परिसरात २२ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाशिकरोड आणि जेलरोड या दोन ठिकाणी शिवजयंती उत्सव होणार आहे. दि.१९ फेब्रुवारी रोजी मिरवणूक, २०ते २२ फेब्रुवारी सायंकाळी ७ ते १०.३० वाजेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे बिटको चौक व सिन्नरफाटासह रेल्वे स्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उड्डाणपुलाखालून जाणारी वाहतूक बंद असेल.

बिटको चौकातून जेलरोडमार्गे व नांदूरनाकाकडून बिटको चौकाकडे दोन्ही बाजूची वाहतूक बंद असेल. रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी दत्त मंदिर सिग्नल, सुराणा हॉस्पिटल, आनंदनगर टी पॉइंट, सत्कार टी पॉइंट, रिपोर्ट कॉर्नरमार्गे रेल्वे स्टेशनवर पर्यायी रस्त्याने जाता येईल.
     
त्याचप्रमाणे सुभाष रोडमार्गे परतीची वाहतूक नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन सुटणाऱ्या सिटी लिंक बसेस नाशिकरोड जुने न्यायालयासमोरून आर्टिलरी रोडमार्गे जयभवानी चौकातून उपनगर सिग्रलमार्गे जातील. पुणे-नाशिक सर्व प्रकारची वाहतूक दत्त मंदिर चौकातून उड्डाणपुलावरुन सिन्नर फाट्याकडे जातील व येतील.

बिटको चौकातून जेलरोडमार्गे नांदूर नाक्याकडे जाणारी वाहतूक इंगळे नगर येथून कॅनल रोड ते हरीविहार नगरमार्गे टाकळीकडे जातील. दूर नाक्याकडून बिटको चौकात येणारी वाहतूक दसक पुलावरुन एकेरी मार्गावर सुरू असेल.

 असा आहे मुख्य मिरवणूक मार्ग 
वाकडी बारव -महात्मा फुले मंडई-भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा मेनरोड-धुमाळ पॉइंट-सांगली बँक सिग्नल-मेहेर सिग्नल-अशोकस्तंभ-रविवार कारंजा-मालेगाव स्टैंड- पंचवटी कारंजामार्गे मालवीय चौकातून रामकुंडापर्यंत.

या मार्गाने वाहतूक वळविली आहे...
- निमाणी व पंचवटी कारंजापासूनच्या सिटीलिंक बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. रविवार कारंजा व अशोतस्तंभमार्गे जाणाऱ्या सिटीलिंक बसेस शालीमारवरुन सुटतील. सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे नाशिकरोड व शहरात इतरत्र जातील.

  -   मालेगाव स्टँड-इंद्रकुंड-पंचवटी कारंजा दिंडोरी नाका- मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टँडकडे दोन्ही मार्ग. 
 
 -  दिंडोरी नाका-पेठ नाका मखमलाबाद नाका-रामवाडी पूलमार्गे इतरत्र- मखमलाबाद नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी पूलमार्गे इतरत्र - ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणारी वाहतूक आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारकामार्गे इतरत्र. 

    - बोधलेनगर सिग्नल, कलानगर, पाथर्डी फाटा, पाथर्डी सिग्नल ते गरवारे दोन्ही बाजूंनी अवजड वाहतूक बंद-पाथर्डी गाव ते शिवाजी पुतळ्यासमोरुन अंबड- सातपूर मार्गावरील अवजड वाहतूक बंद.

- सिडको - अंबङ : गरवारे पॉइंट येथील उड्डाणपुलावरुन द्वारकाकडे. बोधले नगर सिग्नलवरुन द्वारकापर्यंत व तेथून उड्डाणपूलावरुन गरवारे पॉइंटकडे- पाथर्डी गाव, सिग्नलमार्गे सातपूरकडे जाणारी वाहतूक पांडवलेणीसमोरील बोगद्यातून अंबड एमआयडीसीमार्गे वाहने जातील.
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group