बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी तपास यंत्रणा एनआयएला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुझम्मिल शरीफ याला एनएआयने अटक केली आहे.
एनआयए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफला पकडण्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये १८ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.