माफिया डॉन मुख्तार अन्सारीचं तुरुंगातच निधन
माफिया डॉन मुख्तार अन्सारीचं तुरुंगातच निधन
img
दैनिक भ्रमर
बांदा कारागृहात शिक्षा भोगत असलेला माफिया डॉन मुख्तार अन्सारीचं निधन झालं आहे. मुख्तार अन्सारीला गुरुवारी रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तुरुंगातून वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं होतं कारागृहातील तीन डॉक्टरांचे एक पॅनेल मुख्तार अन्सारीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.  मात्र मुख्तारच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचं निधन झालं आहे.

२६ मार्चला दुपारी ३.५५ वाजता मुख्तार अन्सारीला बांदा तुरुंगातून वैद्यकीय महाविद्यालयात दाखलं करण्यात आलं होतं. सकाळपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा माफिया डॉनची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं. त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते.  त्यानंतर हळूहळू मुख्तारचे समर्थक आणि कुटुंबीय बांदा गाठू लागले. मुख्तारचा भाऊ अफजल अन्सारी, मुलगा उमर अन्सारी बांदा येथे पोहोचले, मात्र कोणालाही मुख्तारला भेटू दिले नव्हतं.

“जिंदगी इम्तिहान लेती है..”, चे गायक कमलेश अवस्थी यांचे निधन

मेडिकल कॉलेज प्रशासनाने वेळोवेळी मुख्तार अन्सारीचे हेल्थ बुलेटिन जारी करून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. 16 तास आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर मुख्तारला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुख्तारची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. तीन डॉक्टरांचे एक पॅनल तयार करण्यात आलं होतं, जे तुरुंगात मुख्तारच्या प्रकृतीवर नेहमी लक्ष ठेवून होतं. मात्र आज पुन्हा एकदा मुख्तार अन्सारीची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याचं उपचारादरम्यान निधन झालं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group