श्रावण संपताच चिकन-मटणाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी
श्रावण संपताच चिकन-मटणाच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी
img
Dipali Ghadwaje
श्रावण महिना संपाताच आता खवय्यांनी मटन, चिकनच्या दुकानावर मोठी गर्दी केली आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक जण मासांहार खात नाही. त्यामुळे चिकन, मटण आणि माश्यांचे दर कमी झाले होते. पण आता श्रावण महिना संपाताच चिकन, मटण आणि माश्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. 

श्रावण महिना संपल्याने पोळ्याचा पाडवा मांसाहार प्रेमींसाठी पर्वणी असतो. पोळ्याच्या पाडव्याच्या निमित्याने आज नागपूरात लाखो रुपयांची मटण, चिकनची विक्री होणार आहे. शहरातील विविध मटण मार्केटमध्ये मटण, चिकन खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मटण-चिकनच्या शॉपबाहेर नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पाडव्याच्या निमित्ताने हैद्राबाद, मध्यप्रदेशातून बोकड आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मटण, चिकन विक्रीने आज नागपूरच्या बाजारात मोठी उलाढाल होणार आहे. आज मटण 750 रुपये प्रती किलो दराने विकले जात आहे. गावरण कोंबडी 700 रुपये प्रति किलो तर बॉयलर, कोक्रेल कोंबडी 220 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. श्रावण संपल्यानंतर आता मटण, चिकनच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे.


 
food | nonveg |
इतर बातम्या
Join Whatsapp Group