डाळींच्या किंमती कडाडल्या! तूरडाळ १५ तर मूगडाळ 'इतक्या' रुपयांनी महागली
डाळींच्या किंमती कडाडल्या! तूरडाळ १५ तर मूगडाळ 'इतक्या' रुपयांनी महागली
img
Dipali Ghadwaje
सध्या महागाई खूप जास्त वाढली आहे. अशातच आता सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. यंदा राज्यभरात पावसाने ओढ दिली. याचा मोठा फटका कडधान्य आणि इतर उत्पादनाला बसला. अशातच उन्हाळा सुरू झाल्याने वाळवण तसेच वर्षभराच्या साठवणासाठी डाळींची अधिक प्रमाणात खरेदी केली जात आहे. त्यामुळे आवकेच्या तुलनेत मागणी वाढल्याने दरांतही वाढ होताना दिसून येत आहे.  

गेल्या काही दिवसांत तूरडाळ आणि मूगडाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांना डाळ खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. तूरडाळ जवळपास १५ रुपये तर मूगडाळ १० रुपयांनी महाग झाली आहे. गेल्या काही दिवसात बाजारात तुरडाळ आणि मूगडाळीची मागणी वाढत आहे. त्यामुळेच डाळीच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.

डाळींचे दर वाढल्यामुळे केंद्र सरकारने सर्व विक्रेते, गोदाम मालकांना त्यांच्याकडील तूरडाळीचा साठा घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांना लवकरच साठा मर्यादा लागू होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईत मार्च महिन्यात तूरडाळीचा घाऊक दर हा १२० ते १४० रुपये होता. हा दर आता वाढवला असून १४० ते १७० रुपये झाला आहे. किरकोळ दर १४० रुपयांवरुन १७० ते १९० झाला आहे. तर मूगडाळीचे घाऊक दर ९० ते १०० रुपयांवरुन ११० ते १२० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मूगडाळीचा दर १४० रुपये प्रतिकिलो झाला आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group