सध्या बदलत असलेले वातावरण आणि हवेतील परागकण यामुळे नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा गरमी तर रात्री थंडी असे वातावरण असल्याने त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळेच खवखव, खोकला, सर्दीसारखे आजार होत आहेत. त्यामुळे आजारपणाच्या लहानसहान समस्या वाढत आहेत.
दरम्यान या वातावरणाचा लहान मुलांवर खूप जास्त परिणाम होतांना पहायला मिळत आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला दमा तसेच त्वचेच्या समस्या वाढत आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. काही मुलांमध्ये घसादुखी, टोन्सिलचचा त्रास होत आहे.
तसेच लहान मुलांसोबत घरातील मोठ्या व्यक्तींना आजारपणाचा सामना करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरीकांना सांधेदुखी, हात-पाय दुखणे आणि सर्दी खोकला सारखे आजार होत आहेत.
त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात खूप जास्त गर्दी पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून वाहतूक कोंडी आणि प्रदुषणामुळे नागरीकांना खूप जास्त त्रास सहन करावा लागत आहे.
अशी घ्या स्वतःची काळजी
आजारपण आल्यास सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. डॉक्टरांनी सांगितलेले उपाचर किंवा औषधे घ्यायला हवे. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ सर्दी खोकला राहिला तर डॉक्टरांकडे जायला हवे. काहीजण डॉक्टरांचा सल्ला न घेताच औषधे घेतात. असे केल्यास शरीरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.
थंडीत होणाऱ्या या आजारांकडे विशेष लक्ष द्यायला हवे. प्रदुषणामुळे अनेकदा नाक आणि घसा खवखवतो. याकडे दुर्लक्ष करु नये. लहान मुलांचे योग्य वेळी लसीकरण करायला हवे. या काळात एसीचा वापर कमी करायला हवा. बाहेरील जंक फूड खाऊ नये. जंक फूड खालल्याने अनेक आजारपण येतात.
थंडी असताना नागरिकांनी टू व्हीलर वरून प्रवास करणे टाळावे, बाहेर पडताना स्वेटर, कानटोपी, यांसारखे उबदार कपडे घालावेत, नागरिकांनी नियमित सकस आहार घ्यावा, दमा व ऍलर्जी असणार्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच सर्दी पडसे झाले असल्यास घरीच वाफ घ्यावी. गरम पाणी प्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.