मुंबई, पुणे, सोलापूर अन् कोल्हापूरनंतर जीबीएसचे रूग्ण पुण्यात आढळले आहेत. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम थैमान घातलंय. पुण्यातील रुग्णांची संख्या शंभर पार गेली आहे. आता या व्हायसर जिल्ह्या ओलांडत राज्याभर पसरण्यास सुरूवात झाल्याचे दिसतेय. नागपूरमध्ये जीबीएसचे ६ रूग्ण आढळले आहेत. प्रशासन सतर्क झाले असून उपयायोजना सुरू केली आहे. नागपूर मनपा अलर्ट झाली आहे.
यामध्ये मेडिकल कॉलेजमधील 19 वर्षाचा रुग्णाला कमी त्रास असल्यामुळे जनरल वार्डमध्ये तर आठ वर्षाचा रुग्ण हा गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल आहे. तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये 37 वर्ष रुग्ण हा व्हेंटिलेटरवर आहे. इतर रुग्ण उपचार घेत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना कऱण्यात येत आहे. घारबरू नये, असे आवाहन करण्यात आलेय.
पुण्यात थैमान घातलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण नागपुरात मिळून आले आहे. यात एका रुग्णावर अतिदक्षता विभागात विचार सुरू आहे. तर एक रुग्ण हा जनरल वार्डमध्ये उपचार घेत आहे. इतर तीन रुग्णांना सुट्टी झाल्याची माहिती आहे. तर काही रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तेच नागपूर महानगरपालिकेमधून शहरांमध्ये पोलिओ सर्वेलन्स केले जाते.
यात मागील तीन महिन्यांमध्ये 5 ते 6 मुलांमध्ये जीबीएस मिळून आला होते. आता मात्र त्यांची परिस्थिती सुस्थित असल्याच मनपा आरोग्य प्रशासनाकडून सांगितलं जातं आहे.