रात्री व्यवस्थित जेवले अन् सकाळी उठलेच नाहीत... झोपेत प्राण का जातात? हृदयविकार ते स्ट्रोक; तज्ज्ञांनी उलगडलं गुपित
रात्री व्यवस्थित जेवले अन् सकाळी उठलेच नाहीत... झोपेत प्राण का जातात? हृदयविकार ते स्ट्रोक; तज्ज्ञांनी उलगडलं गुपित
img
नितीशा कुलकर्णी









आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, झोपेत मृत्यू येणं हा सर्वात शांत आणि वेदनारहित मार्ग आहे. दिवसभराची धावपळ करून जेव्हा आपण रात्री अंथरुणावर पडतो, तेव्हा आपण एका वेगळ्याच जगात जातो. पण काही लोकांसाठी ही झोप शेवटची ठरते. तुम्ही अनेकदा तुमच्या आजूबाजूला ऐकलं असेल की रात्री झोपेतच एखाद्याने प्राण गमावले. "रात्री व्यवस्थित जेवले, गप्पा मारल्या आणि सकाळी उठलेच नाहीत," अशा बातम्या आपण अनेकदा ऐकतो. हे ऐकायला जितकं धक्कादायक वाटतं, तितकंच त्यामागचं वास्तव गुंतागुंतीचं आहे. वैद्यकीय भाषेत याला 'नोक्टर्नल डेथ' असं म्हणतात. जगभरात दररोज रात्री अनेक लोक आपल्या बिछान्यावर शेवटचा श्वास घेतात. पण असं अचानक नेमकं काय घडतं की शरीर साथ देणं बंद करतं? यामागची मुख्य वैद्यकीय कारणं कोणती? चला तर मग, या सायलेंट किलरबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

1. कार्डिॲक अरेस्ट
झोपेत मृत्यू होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे हृदयाचे ठोके अचानक बंद पडणे. याला 'सडन कार्डिॲक अरेस्ट' म्हणतात. एका 2021 मधील अभ्यासानुसार, रात्रीच्या वेळी होणाऱ्या कार्डिॲक अरेस्टपैकी 22% घटना रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत घडतात. विशेष म्हणजे, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये झोपेत कार्डिॲक अरेस्ट येण्याचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे.

हार्ट अटॅक
म्हणजेच हृदयविकाराचा झटका ज्याला आपण मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणतो, तो झटका तेव्हा येतो जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण होतो. जर हा अटॅक तीव्र असेल, तर त्याचा परिणाम मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर होतो आणि श्वासोच्छवास थांबतो. यामुळे रेस्पिरेटरी अरेस्ट= होऊन व्यक्तीचा मृत्यू ओढवू शकतो.

ॲरिथमिया
हृदयाची धडधड किंवा ठोके अनियंत्रित होण्याला 'ॲरिथमिया' म्हणतात. आपल्या हृदयातील विद्युत लहरींमध्ये बिघाड झाला की हृदय योग्य प्रकारे आकुंचन पावत नाही. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. एट्रियल फिब्रिलेशनमुळे हृदयात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, ज्या झोपेत जीवघेण्या ठरू शकतात.

कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर
ही एक दीर्घकालीन स्थिती आहे जिथे हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते. हृदय निकामी झाल्यामुळे फुफ्फुसात पाणी साचणे किंवा पाय आणि घोट्यावर सूज येणे असे प्रकार घडतात. यामुळे रात्री श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊन अचानक मृत्यू होऊ शकतो.

स्ट्रोक म्हणजेच मेंदूघाताचा झटका
जेव्हा रक्ताची गाठ मेंदूच्या रक्तवाहिनीत अडकते किंवा एखादी रक्तवाहिनी फुटते, तेव्हा स्ट्रोक येतो. झोपेत स्ट्रोक आल्यावर श्वासोच्छवास, स्नायू नियंत्रण आणि शुद्ध हरपते. झोपेत असल्याने व्यक्तीला मदतीसाठी हाक मारणेही अशक्य होते, ज्यामुळे हा प्रकार बहुधा जीवघेणा ठरतो. झोपेत मृत्यू येणं ही जरी एक शांत प्रक्रिया वाटत असली, तरी त्यामागे शरीरातील गंभीर आजार दडलेले असू शकतात. आपल्या जीवनशैलीत केलेले छोटे बदल आणि आरोग्याप्रती असलेली सतर्कता अशा आकस्मिक संकटांपासून आपल्याला वाचवू शकते. शरीर हे एक यंत्र आहे, त्याची वेळीच काळजी घेणं आपल्याच हातात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group