तुमचा पाय दुखतोय की डोकं, हे त्या छोट्याशा गोळीला कसं कळतं? जाणून घ्या पेनकिलरच्या 'जादू'मागचं विज्ञान!
तुमचा पाय दुखतोय की डोकं, हे त्या छोट्याशा गोळीला कसं कळतं? जाणून घ्या पेनकिलरच्या 'जादू'मागचं विज्ञान!
img
नितीशा कुलकर्णी





डोक दूखी, अंग दूखने, हात पाय दूखने काहिही दूखले की आपण सहज सगळ्यावर पेन किलर खातो पण तुम्ही कधी विचार केला आहे का सगळ्या दूखण्यावर पेन किलअर कशी काम करते तिला कस कळते तुमचा पाय दूकतोय की हात जाणून घ्या कशी काम करते ही छोटी दिसणारी गोळी कधी कामाच्या व्यापात डोकं ठणकायला लागतं, तर कधी दिवसभराच्या धावपळीनंतर पाय इतके दुखतात की वाटतं बस आता गळून गेलो.

अशा वेळी आपण काय करतो? पटकन कपाटातून किंवा बॅगेतून एक पेनकिलर काढतो, पाण्यासोबत घेतो आणि 20-30 मिनिटांत जादू झाल्यासारखं आपल्याला बरं वाटू लागतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, आपण घेतलेली ती छोटीशी गोळी बरोबर दुखणाऱ्या जागीच कशी पोहोचते? तिला कसं कळतं की तुमचं डोकं दुखतंय की दाढ की पाय? चला, आज या पेनकिलरच्या 'जादू'मागचं खरं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया वेदना म्हणजे नक्की काय?जेव्हा आपल्या शरीराला कुठे जखम होते किंवा सूज येते, तेव्हा त्या भागातील पेशी प्रोस्टाग्लँडिन्स नावाचं एक रसायन तयार करतात.

हे रसायन तिथल्या मज्जातंतूंना डिवचतं. मग हे मज्जातंतू वेगाने धावत जाऊन मेंदूला सांगावा धाडतात की, मालक, इथे काहीतरी गडबड आहे जेव्हा मेंदूला हा सिग्नल मिळतो, तेव्हा आपल्याला वेदना जाणवते. खरं तर वेदना होणं हे शरीरासाठी चांगलं आहे, कारण ती आपल्याला धोक्याची सूचना देते. पेनकिलर शरीरात गेल्यावर काय होतं?

जेव्हा तुम्ही पेनकिलर घेता, तेव्हा ती थेट दुखणाऱ्या भागाकडे जात नाही. ती आधी तुमच्या पोटात जाते, तिथे विरघळते आणि मग रक्तामध्ये मिसळते. रक्त तर संपूर्ण शरीरात फिरत असतं, त्यामुळे हे औषधही संपूर्ण शरीरात पसरतं. या औषधांमध्ये असे घटक असतात जे शरीरातील त्या प्रोस्टाग्लँडिन्स रसायनाची निर्मितीच रोखतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, हे औषध मेंदूकडे जाणारा तो वेदेनेचा फोन कॉल मध्येच कापून टाकतं. कॉल कापला गेला की मेंदूला सिग्नल मिळत नाही आणि आपल्याला वाटतं की वेदना गायब झाली.

औषधांचे दोन प्रकार आणि त्यांची कार्यपद्धती

(उदा. इब्युप्रोफेन, एस्पिरिन): ही औषधं जखमेच्या ठिकाणी जाऊन सूज कमी करतात आणि वेदनेचे संदेश रोखतात.. पॅरासिटामॉल: हे औषध प्रामुख्याने मेंदूवर काम करतं. ते मेंदूची वेदना सहन करण्याची क्षमता वाढवतं आणि शरीराचं तापमान (ताप) कमी करतं. तज्ज्ञ काय म्हणतात?आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पेनकिलर हे फक्त एक मलम आहे, मूळ आजारावरचा उपाय नाही. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे डॉक्टर सांगतात की, "पेनकिलर वेदना दाबू शकते, पण ती वेदना का होतेय हे शोधणं महत्त्वाचं आहे.

वारंवार स्वतःच्या मनाने गोळ्या घेणं म्हणजे शरीराच्या नैसर्गिक अलार्म सिस्टीमला जाणीवपूर्वक बंद करण्यासारखं आहे." अनेक लोक डोकं दुखलं की लगेच गोळी घेतात, पण याचे गंभीर परिणाम होऊ शकतातपेनकिलरचा अतिवापर किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरू शकतो. वारंवार गोळ्या घेतल्याने पोटात अल्सर किंवा जळजळ होऊ शकते. काही संशोधनानुसार, सतत पेनकिलर घेणाऱ्यांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतो. पेनकिलर ही आपत्कालीन स्थितीसाठी उत्तम आहे, पण ती तुमची सवय बनता कामा नये. जर तुम्हाला वारंवार वेदना होत असतील, तर गोळी घेण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाऊन त्याचं मूळ कारण शोधणं कधीही चांगलं. शेवटी, शरीर तुमचं आहे, त्याची काळजी घेणं तुमच्याच हातात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group