२५ एप्रिल २०२६
उन्हाळा सुरू झाला की जेवनाचा कंटाळा येतो. सतत कहीतरी थंड पदार्थ खावेसे वाटतात. बाहेरून उन्हातून घरी आल्यावर थंड प्यावेसे वाटते. मग आपण बाहेरचे शितपेय पितो पण त्याचे आतीसेवन तुमच्या आरोग्यासाठी हाणीकार ठरू शकते. मात्र अता तुम्ही गरच्या घरी तयार करा हे चवदार आणि आरोग्यासाठी चांगले असलेले सरबत.
तुम्ही एकदा हे सरबताचं मिश्रण तयार करून ठेवलं, की तुम्ही कधीही काही मिनिटांत ताजं सरबत बनवू शकता. पानामध्ये असलेले घटक शरीरासाठी फायदेशीर मानले जातात, तर सोप (बडीशेप) वजन नियंत्रणासाठी मदत करते. उन्हाळा सुरू झाला की घराघरांत विविध प्रकारची सरबतं तयार केली जातात.
विशेषतः पाहुणे अचानक आले तर लगेच काहीतरी थंड पेय बनवण्याची गरज भासते. मात्र, अनेकदा सरबतासाठी लागणारे साहित्य घरात उपलब्ध नसते. अशा वेळी एक सोपा आणि झटपट पर्याय म्हणजे पान सरबत. एकदा हे सरबताचं मिश्रण तयार करून ठेवलं, की तुम्ही कधीही काही मिनिटांत ताजं सरबत बनवू शकता.
पानामध्ये असलेले घटक शरीरासाठी फायदेशीर मानले जातात, तर सोप (बडीशेप) वजन नियंत्रणासाठी मदत करते. त्यामुळे हे सरबत चविष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यदायीही आहे. ही खास रेसिपी सारिका पापडकर यांनी सुचवली आहे. पान सरबतासाठी लागणारे साहित्य: 5 पानं, 1 वाटी साखर, 25 ग्रॅम भिजवलेली सोप (बडीशेप), वेलची आणि लिंबू हे साहित्य लागेल.
कृती: सर्वप्रथम पान, सोप आणि वेलची मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि एकसंध मऊ पेस्ट तयार करा. त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करून त्यात साखर घाला. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात तयार केलेलं पानाचं मिश्रण मिसळा. हे मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत शिजवा.
शेवटी त्यात लिंबाचा रस घालून आणखी 2 मिनिटं उकळवा. गॅस बंद करून मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या आणि नंतर काचेच्या बरणीत साठवून ठेवा. सरबत बनवण्याची पद्धत: एका ग्लासमध्ये थंड पाणी घेऊन त्यात 2 चमचे तयार पानाचं मिश्रण घाला. त्यात बर्फाचे तुकडे टाका.
आवडीनुसार थोडं मीठ घातलं तरी चालेल. अशाप्रकारे तुमचं थंडगार आणि चविष्ट पान सरबत तयार होईल. जर तुम्हाला लगेच सरबत बनवायचं असेल, तर हे मिश्रण न शिजवता देखील वापरता येते. मात्र, दीर्घकाळ साठवण्यासाठी मिश्रण शिजवून ठेवणं आवश्यक आहे.
Copyright ©2026 Bhramar