काळजी घ्या! राज्यात उन्हाचा चटका वाढणार; 'हा' भाग असणार अधिक उष्ण
काळजी घ्या! राज्यात उन्हाचा चटका वाढणार; 'हा' भाग असणार अधिक उष्ण
img
दैनिक भ्रमर
विदर्भात झालेली गारपीट, तसेच पावसामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमनात चढ-उतार होत आहेत. आता मात्र राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण तसेच विदर्भात हवामान कोरडे आहे. परिणामी पुढील चार ते पाच दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा वाढून कडक उन्हाळा वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

विदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वारे, गारपीटमुळे गारवा निर्माण झाला. परिणामी कमाल व किमान तापमानात घट झाली. आता मात्र या भागातील पाऊस थांबला. पुढील चार ते पाच दिवसांनंतर कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

कपिल शर्माला कोर्टाकडून दिलासा ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागात हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे या भागात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी उन्हाचा चटका वाढण्याची चिन्हे आहेत.

सध्या विदर्भात चक्राकार वारे कायम आहेत. पूर्वमध्ये आणि वायव्य अरबी समुद्रात उत्तर केरळ ते कर्नाटक, तसेच पुढे उत्तर महाराष्ट्रापर्यंत कार्यरत आहेत. द्रोणीय स्थिती कार्यरत आहे, मात्र या तीनही स्थितीचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे कोरडे हवामान राहून उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group