पिस्तुल काढलं अन् स्वत:वरच गोळ्या झाडल्या, कारण... आंबा व्यापाऱ्याचा टोकाचा निर्णय
पिस्तुल काढलं अन् स्वत:वरच गोळ्या झाडल्या, कारण... आंबा व्यापाऱ्याचा टोकाचा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
रत्नागिरीतीतुन एक खळबळजनक घटना समोर आली आहे.  रत्नागिरीतील आंबा व्यावसायिक रुपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वत:वर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील ताणदे गावात घडली.  नागवेकर हे तानदे गावचे उपसरपंच राहिलेले आहे.  

प्राथमिक माहितीनुसार, रुपेश नागवेकर यांनी त्यांच्या ताणदे येथील राहत्या घरी सोमवारी स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून घेतल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील लोक आणि शेजारी धावून आले असता, रुपेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

रुपेश नागवेकर हे एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते आजारपणामुळे त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. आजारपणासोबतच व्यवसायातील आर्थिक विवंचना आणि व्यापाऱ्यांची देणी यांमुळे ते मानसिक तणावाखाली होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून  अधिक तपास सुरु आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group