सध्या देशभरात उन्हाचा जोरदार तडाखा सुरु आहे. वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असून आता पावसाची प्रतीक्षा सुरु आहे. परंतु त्याआधी आधी आता ही बातमी वाचा कारण तुम्ही जरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तरीही आता आता पुढचे ९ दिवस मात्र उन्हाची तीव्र दाहकता सहन करावी लागणार आहे. कारण आता आज आजपासून नवतपा सुरु होत आहे.
ज्येष्ठ महिन्यातील सर्वाधिक उष्ण मानला जाणारा ‘नवतप’ कालावधी आज, २५ मेपासून सुरू झाला असून तो २ जूनपर्यंत राहणार आहे. या नऊ दिवसांत उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते. तापमानाचा पारा चढल्यामुळे नागरिकांना उष्माघात, डिहायड्रेशन आणि इतर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, नवतपा काळात उष्माघाताचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे, योग्य आहार घेणे आणि उन्हापासून बचाव करणे अत्यंत आवश्यक आहे.
नवतपा म्हणजे काय?
ज्येष्ठ महिन्यातील सलग नऊ दिवस अत्यंत उष्ण असतात. या कालावधीला ‘नवतप’ असे म्हटले जाते. या दिवसांत सूर्याची तीव्रता वाढल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवतो. अनेक भागांत तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असते.