गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच आहे. अशातच आता राज्यात सध्या थंडी गायब झाली असून उकाडा वाढायला सुरूवात झाली आहे. उत्तर भारतातील बहुतांशी भागामध्ये आज थंडी कमी झाली होती. उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत. तसेच राज्यात ढगाळ आणि कोरड्या हवामानामुळे थंडी कमीच आहे. अशामध्ये आता राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत चालला आहे.
राज्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतातील अनेक भागात थंडी कमी झाली होती. आज उत्तर प्रदेशातील फुरसगंज येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांबरोबरच वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील थंडीतील चढ उतार कायम आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात वाढ झालेली आहे.
आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील इतर भागातील किमान तापमान १२ अंशाच्या पुढे गेले आहे. राज्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसंच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाला पोषक हवामान निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.