उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यांचा जोर वाढल्याने महाराष्ट्रातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. राज्यातील अनेक शहरांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याखाली नोंदवले जात आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. सकाळच्या वेळी सर्वत्र धुके बघायला मिळत आहे. मराठवाड्यासह विदर्भात थंडी वाढली आहे. संपूर्ण डिसेंबर महिना थंडी असणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शाळेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून शाळा भरण्याची वेळ पुढे ढकलण्यात आली.
महाराष्ट्रात हुडहुडी , निफाड येथे 5.6 अंश सेल्सिअसची नोंद
नाशिकसह पुणे, मुंबईमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून शीत लहरी येत आहेत, ज्यामुळे गारठा अधिक वाढत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमध्ये मोठी वाढ होईल आणि राज्यातील हुडहुडी कायम राहिल. राज्यात जेऊरमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झाली. 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
निफाड येथे 5.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली. परभणीत 5.5 अंश तापमानाची नोंद झाली. आहिल्यानगर, नाशिक येथे 8 पेक्षाही कमी अंश तापमान होते. वाशिम, सातारा, भंडारा, गोदिंया, नागपूर येथे 10 अंश सेल्सिअसची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे.
उत्तर भारतात जरी थंडीचा कडाका असला तरीही केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील देखील नोव्हेंबरच्या सुरूवातीला पाऊस होता. आता पूर्ण डिसेंबर महिना थंडी कायम राहणार आहे. थंडी वाढल्याने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली. थंडी, खोकला आणि तापीच्या रूग्णात मोठी वाढ झाली आहे.