नाशिक गारठलं! 7.4  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
नाशिक गारठलं! 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
img
Dipali Ghadwaje
नाशिक : गेल्या 24 तासात नाशिक येथे सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. नाशिकचा पारा 7.4 अंशापर्यंत खाली आला होता. जिल्ह्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जिल्ह्याचे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून नाशिकचे तापमान दीड अंश डिग्री सेल्सिअस ने घटले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात नाशिककरांना थंडी जाणविणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यावर्षी  थंडीच्या हंगाम सुरू झाल्यानंतर  प्रथमच नाशिक जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे मागील तीन दिवसापासून नाशिकचे तापमान हे 14.2 डिग्री सेल्सिअस पर्यंत स्थिरावले होते परंतु तीन दिवसांमध्ये प्रथमच नाशिकच्या तापमानामध्ये मोठी घसरण झाली. शनिवारी सकाळी हवामान विभागाने दाखल केलेल्या नोंदणी नुसार नाशिकचे तापमान हे घटून 12. 5 अंश डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.

मागील काही दिवसापासून रात्री थंड तर दिवसात गरम असे वातावरण होते, त्यामुळे यावरती थंडी पडणार की नाही अशा स्वरूपाचा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु आता या मोठ्या प्रमाणावरती तापमानामध्ये घसरण झाल्याने येणाऱ्या दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता कृषी तज्ञ व्यक्त करीत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group