कडाक्याच्या थंडीमध्ये एकाच कुटुंबातील आई-वडील आणि तीन चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री श्रीनगरच्या पंद्रेथन परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार , कडाक्याच्या थंडीमध्ये घरातील तापमान सामान्य राहावे , म्हणून हिटर वापरण्यात आला होता . परंतु तोच हिटर जिवावर उठल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे , हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यूची ही धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा घडली. मृतक कुटुंब श्रीनगरच्या पंद्रेथन परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते. कुटुंबाच्या पाच सदस्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे बेशुद्ध होऊन झाला. हे कुटुंब मूळचे बारामुला येथील आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास वेगाने करण्यास सुरू केला आहे. कुटुंबातील पाचही जणांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झालाय. सध्या जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी आहे. थंडीचा प्रभाव कमी करण्यासाठी हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या हीटिंग साधनांचा वापर करतात, ज्यामुळे खोलीत ऑक्सिजनची कमतरता होऊन अशा प्रकारचे अपघात होतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.
श्रीनगरजवळील पंद्रेथन येथे ही दुर्देवी घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.