राज्यात हुडहुडी वाढली !  पुणे-नाशिक गारठलं , निचांकी तापमानाची नोंद
राज्यात हुडहुडी वाढली ! पुणे-नाशिक गारठलं , निचांकी तापमानाची नोंद
img
Dipali Ghadwaje
राज्यात गेल्या महिन्यात नागरिकांनी ऑक्टोबर हीटचा चटका अनुभवला. आत राज्यात थंडीची चाहूल लागली असून बहुतांश जिल्ह्यातील पारा कमालीचा घसरला आहे. यात जळगाव, पुणे, सांगली, नागपूर, नाशिक आदी जिल्ह्याच्या तापमानात विशेषतः घट झाली आहे.

गेल्या 24 तासात नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील तापमानात निचांकी घट नोंदविण्यात आली आहे. तापमानाचा पारा घसल्याने हुडहुडी वाढली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सकाळी आणि रात्रीच्या तापमानाच मोठी घट होत थंडी जाणवू लागली आहे. 

गुरूवारी सकाळी पुण्यात 15.2अंश सेल्सिअस तर सांगलीत राज्यात सर्वात कमी 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंदनों करण्यात आली. हवामानविभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळेवातावरणात बदल होत तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पूर्वराजस्थान भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियसची घट झाली आहे. वातावरणाच्या या स्थितीचा परिणाम राज्यातील तापमानावर देखील झाला आहे.

निचांकी तापमानाची नोंद

राज्यात यंदा परतीचा पाऊस लांबला. त्यामुळे हिवाळा थोडा उशीराने सुरु झाला आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात तापमानात वाढ होत लोकांनी ऑक्टोबर हीट देखील अनुभवली. त्यामुळे प्रत्येकाला थंडीची प्रतिक्षा लागून होती. आता राज्यात थंडीचा आगमन झाले असून हळूहळू थंडीचा जोर देखील वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये नाशिकमध्ये राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले. या ठिकाणी 14.4 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली तर सांगली देखील 14.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

येत्या आठ दिवसांच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता राज्यात पुढील आठवड्यात हवामान कोरडे आणि तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. राज्याता गेल्या 24 तासात पुण्याचे तापमान 15.2 अंश सेल्सिअस, जळगाव 15.8 अंश सेल्सिअस, महाबळेश्वर 15.6 अंश सेल्सिअस, मालेगाव 17.8 अंश सेल्सिअस, सातारा 16.6 अंश सेल्सिअस, परभणी 18.3 अंश सेल्सिअस, नागपूर 18.6 अंश सेल्सिअस, सांगली 14.4 अंश सेल्सिअस तर अहिल्यानगरात 14.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group