गेल्याच महिन्यात सोलापुरात एसटी बसही जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली होती. अशातच पुन्हा एकदा कडक उन्हाच्या झळांनी लक्ष वेधललेल्या सोलापुरात पेट्रोल पंप परिसरात स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सोलापूर-मंगळवेढा महामार्गवरील देगाव जवळील पेट्रोल पंपावरील ही घटना असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. स्कॉर्पिओला नेमकी कशामुळे आग लागली हे अद्याप आहे. मात्र, या घटनेनंतर पेट्रोल पंपावरील कर्मचारी व स्टाफही काही काळ घाबरुन गेला होता.
स्कॉर्पिओ आग दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, गाडीत डिझेल भरल्यानंतर चालकाला शंका येताच त्याने गाडी बाजूला घेत प्रसंगावधानता दाखवली , ड्रायव्हरने गाडी बाजूला घेताच अचानक गाडीत लागलेल्या आगीने रौद्र रूप घेतलं, त्यानंतर ड्रायव्हर गाडी सोडून दूरवर गेला होता.
दरम्यान अग्निशमन दल आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात अतोनात प्रयत्न केल्याने मोठी घटना टळली. एकीकडे उन्हाचा पहार वाढत असताना दुसरीकडे अशा दुर्घटना घडत असल्याने पुन्हा तापमानाचीच चर्चा होत आहे.