गोदावरी नदी पुलाचा काथडा तोडून कार थेट नदीत ; भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
गोदावरी नदी पुलाचा काथडा तोडून कार थेट नदीत ; भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
img
दैनिक भ्रमर
नाशिक : नाशिक मधून भीषण अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. गोदावरी नदीच्या पुलाजवळ एक भीषण अपघात झालाय. यात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल गंमत जम्मत परिसरातील हा अपघात झाल्याचं समोर आलंय. गंगापूर धरण परिसरात असलेल्या गोदापात्रात काल मध्यरात्री एक चारचाकी वाहन थेट पुलावरून नदीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. दरम्यान या अपघातामध्ये चारचाकी वाहनात असलेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.  



नेमकं कसा घडला अपघात? 

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या गंमत जंमत हॉटेलजवळ काल मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. कार थेट पुलाचे कठडे तोडून गोदावरी नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. 

इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group