चालकाचं नियंत्रण सुटलं अन्......; होळीच्या दिवशीच माय-लेकींसह तिघांचा मृत्यू
चालकाचं नियंत्रण सुटलं अन्......; होळीच्या दिवशीच माय-लेकींसह तिघांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
देशभरात होळी आणि रंगपंचमीचा उत्सव धुमधडाक्यात सुरू असताना बिहारच्या बेगुसराय येथे मात्र एक दुर्दैवी घटना घडली. होळीनिमित्त गावाकडे निघालेल्या कुटुंबावर काळाने झडप घातली. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या घटनेत माय-लेकींसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना देवी, नम्रता कुमारी आणि काजल कुमारी अशी मृतांची नावे आहेत. तर सुधीर कुमार सिंग त्यांचा मुलगा ओम कुमार आणि चालक अशी जखमींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गायघाट येथील सुधीर कुमार होळी सणानिमित्त जमुई येथील सासरच्या मंडळीकडे जात होते. सोमवारी पहाटे त्यांची कार बछवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमटियाजवळ आली असता, अचानक कारचे नियंत्रण सुटले. काही क्षणातच भरधाव वेगात असलेल्या कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली.

या घटनेत अर्चना देवी, नम्रता कुमारी आणि काजल कुमारी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ऐन होळीच्या दिवशी ही दुर्घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group