बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भीषण अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचलेल्या मंत्र्यावर संतापलेल्या गावकऱ्यांनीच हल्ला चढवला आहे.
हे ही वाचा
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पाटणातील शाहजहांपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये मालवण गावातीलही काही लोकांचा समावेश होता. या अपघातामुळे गावात प्रचंड संताप होता. याच अपघाताच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्रवण कुमार आज सकाळी या पीडित कुटुंबियांना भेट देण्यासाठी गावात गेले होते. मात्र, अपघातामुळे ग्रामस्थ त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी आधीपासूनच तयार होते.
हे ही वाचा
बिहार सरकारचे ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार आणि हिल्साचे आमदार कृष्णा मुरारी उर्फ प्रेम मुखिया यांच्यावर संतप्त ग्रामस्थांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक हवालदार गंभीर जखमी झाला असून काही अंगरक्षक आणि समर्थकांनाही मारहाण करण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मंत्री श्रवण कुमार यांना गावातून पायी पळ काढावा लागला. पोलिसांनी तणावग्रस्त भागात मोठा बंदोबस्त तैनात करून चौकशी सुरू केली आहे.