धक्कादायक!  शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, बचावकार्य सुरू
धक्कादायक! शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, बचावकार्य सुरू
img
Dipali Ghadwaje
बिहारमधील मुजफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक नाव नदीत उलटली आहे. त्यात १४ विद्यार्थी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या नावेमध्ये एकुण ३० विद्यार्थी होते. ही घटना समोर येताच एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील बागमती नदीच्या गायघाटवर ही घटना घडली आहे. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, भटगामाच्या मधुरपट्टीमधील पीपल घाटावरुन ही मुलं प्रवास करत होती. भटगामा मधुरपट्टी येथील पीपळ घाटातून मुले शाळेत जात असताना ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

दरम्यान त्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मुलांचा शोध सुरु केला आहे. काहींनी त्या मुलांना नदीतून बाहेर काढले आहे. तर अनेकजण बेपत्ता आहे.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली आहे. 

नदीत पाण्याचा जोरदार प्रवाह असल्याने बचाव कार्य करताना अडचणी येत आहेत. याशिवाय, या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे नदीवर पूल बांधण्याची मागणी करत आहोत, मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या बोटीत लहान मुलांसह काही महिलाही होत्या, असे सांगण्यात येत आहे.  या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group