सापाचे चावणे म्हणजे मृत्यू,मात्र बिहार मध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. एका तरुणाला साप चावला. यानंतर संतापाच्या भरात तरुणाने त्याच सापाचा चावा घेतला. आणि यात सापाचा मृत्यू झाला.
नक्की घडलं काय?
बिहारमधील नवादा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.रेल्वे कर्मचारी संतोष लोहार वय ३५ हा बिहारमधील रजौलीच्या घनदाट जंगलात रेल्वे रुळ टाकण्याचं काम करत होता.. यावेळी उशिरा सर्व कामगार त्यांच्या बेस कॅम्पमध्ये झोपले होते. यावेळी संतोषला सर्पदंश झाला. यानंतर संतप्त झालेल्या संतोष याने लोखंडी रॉडच्या साहाय्याने सापाला पकडले. सापाला पकडल्यानंतर त्याने सापाला तीन वेळा चावा घेतला. यानंतर सापासह जे घडलं ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.
सापाचा मृत्यू
संतोष याने सापाला तीन वेळा चावा घेतल्यानंतर सापाचा मृत्यू झाला. माणसाने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेत सापाचा मृत्यू झाला. तरी संतोषला काहीच झालेले नाही. तो सुखरुप आहे. सापाचा दंश झाल्याने माणसाचा मृत्यू होतो. मात्र, इथं माणसाने सापाचा चावा घेतल्याने सापाचा मृत्यू झाला आहे.
माणसाने चावा घेतल्याने सापाचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. संतोष लोहार हा मुळचा झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यातील पांडुका येथील रहिवासी आहे. संतोष लोहार याला सर्पदंश होताच तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला काहीच झाले नाही.
संतोष लोहार याला ज्या सापाने चावा घेतला त्याच सापाला त्याने तीन वेळा चावा घेतला. या घटनेत संतोषचा नाही तर सापाचा मृत्यू झाला आहे. सापाचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला.सर्पदंश झालेल्या व्यक्तीने सापाच्या पाठीला चावल्यास त्या व्यक्तिच्या शरीरातील विष पुन्हा सापाकडे जाते, अशी सर्वसाधारण समजूत भारतात अनेक भागांत आहे.