धक्कादायक घटना : तरुणाला चावलेल्या सापाचा काही वेळातच मृत्यू, कुठे घडली घटना?
धक्कादायक घटना : तरुणाला चावलेल्या सापाचा काही वेळातच मृत्यू, कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
एका विषारी डोंगरबेलिया सापाने एका तरुणाला चावा घेतला. त्यानंतर काही मिनिटांतच साप मरण पावला. कुटुंबातील सदस्यांनी मृत सापाला आणि तरुणाला जिल्हा रुग्णालयात नेलं. तरुणाला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील नवेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील खुडसोडी गावात घडली आहे.

सर्पदंशाचा बळी सचिन गजब नागपुरे (२५) यांचा मुलगा, कार मेकॅनिक म्हणून काम करतो. तो गुरुवारी सकाळी ७ वाजता त्याच्या शेतात गेला होता. तिथे अचानक त्याचा पाय सापावर पडला. सापाने त्याला चावा घेतला, त्यानंतर मात्र काही वेळातच साप वेदनेने मरण पावला.

त्या तरुणाने आपल्या कुटुंबियांना याची माहिती दिली. कुटुंबिय घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी सापाला आणि त्या तरुणाला रुग्णालयात नेलं. येथे कुटुंबियांनी सांगितलं की, त्याला चावणारा साप सामान्य साप नव्हता तर डोंगरबेलिया साप होता. तो अत्यंत विषारी आहे.

पीडित सचिनने सांगितलं की, मी वेगवेगळ्या झाडांच्या लाकडाने दात घासतो. तो सात ते आठ वर्षांपासून चिडचिडीया, पिसुंडी, पळसा, जाम, आंबा, तुअर, आजन, करंजी, कडुलिंबाच्या झाडाच्या लाकडाने दात घासत आहे. यामुळे साप त्याला चावल्यानंतर मेला असावा असं बोललं जात आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group