पाणीपुरी खाताना हे काय झालं, पाणीपुरीच्या ठेल्यावर साप आला अन...
पाणीपुरी खाताना हे काय झालं, पाणीपुरीच्या ठेल्यावर साप आला अन...
img
वैष्णवी सांगळे
पाणीपुरी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. पाणीपुरी दिसली पण खायची टाळली हे खवय्यांच्या बाबतीत क्वचितच होतं , नाही का ? पण याच पाणीपुरीच्या ठेल्यांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अनेकदा समोर येतो. अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. विरार शहरात तर चक्क नागरिकांना सापाचे दर्शन झाले. याच व्हिडीओ देखील समोर आला आहे. 

विरार शहरातील एका गजबजलेल्या रस्त्यावरील पाणीपुरीच्या ठेल्यावर साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक ठेल्यावरील साहित्याच्या आडून एक साप बाहेर आला अन पाणीपुरीचा आनंद लुटणाऱ्या ग्राहकांच्या समोर अचानक साप आल्याने त्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. यावेळेस परिसरात एकच पळापळ आणि घबराट निर्माण झाली. सुदैवाने, या सापाने कोणालाही इजा केली नाही. 

उपस्थित असलेल्या काही तरुणांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपला, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  सुदैवाने सर्पमित्रांनी किंवा स्थानिक नागरिकांच्या मदतीने सापाला सुरक्षितरीत्या बाजूला करण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मात्र या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उघड्यावर ठेवलेले साहित्य, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची गुणवत्ता आणि अन्न हाताळण्याच्या पद्धतीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. 
Snake | Virar |
इतर बातम्या
Join Whatsapp Group