इमारत दुर्घटनेवर मानवाधिकार आयोगाने घेतली दखल, पोलीस महासंचालकांना नोटीस
इमारत दुर्घटनेवर मानवाधिकार आयोगाने घेतली दखल, पोलीस महासंचालकांना नोटीस
img
वैष्णवी सांगळे
पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व परिसरात २७ ऑगस्ट २०२५ रोजी येथील रमाबाई अपार्टमेंटचा एक भाग कोसळला होता. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. आता चार मजली इमारत दुर्घटनेवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.या घटनेला मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी जोडत आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावत दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

महापालिकेच्या पातळीवर तातडीने चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने या प्रकरणातील जबाबदार अधिकारी, कंत्राटदार आणि इतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत.

या चार मजली इमारतीत सुमारे ५० फ्लॅट आणि ६ दुकाने होती. कोसळलेल्या भागात १२ फ्लॅट असल्याचे सांगण्यात आले आहे. इमारतीचा मागील भाग अचानक कोसळल्याने मोठी मानवी हानी झाली. मृतांच्या कुटुंबीयांमध्ये आक्रोश पसरला असून स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी बांधलेली ही रचना बेकायदेशीर होती, तरीदेखील रहिवासी वसई-विरार शहर महानगरपालिकेला नियमित कर भरत होते. रहिवाशांना असे वाटत होते की नोटरीकृत कागदपत्रांनुसार ही इमारत अधिकृत आहे. यामुळेच त्यांनी या घरात निर्धास्तपणे वास्तव्य केले होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group