भीषण अपघात : भरधाव कंटेनरची कारला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी
भीषण अपघात : भरधाव कंटेनरची कारला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी
img
Dipali Ghadwaje
रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे , अशातच  पालघरमध्ये कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. 

अपघाताची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात भीषण अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणार्या भरधाव कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारमधल तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे.

अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

पालघरच्या मनोर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचा तपास मनोर पोलिसांकडून सुरू आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group