दुर्दैवी घटना : दुचाकीआणि रिक्षाचा अपघात; शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू
दुर्दैवी घटना : दुचाकीआणि रिक्षाचा अपघात; शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू
img
Jayshri Rajesh
दुचाकी आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला असुन. या अपघातामध्ये एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पालघरमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. पालघरमधील डहाणू-जव्हार मार्गावर रिक्षा आणि दुचाकीची धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. संगीता सुभाष डोकफोडे (१४ वर्षे) असं मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे डहाणू-जव्हार मार्गावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.

अंकिता राजेश हाडळ, नयना राजेश हाडळ, लता वेडगा, प्रमोद सुरेश लोहार, कैलास धानमेर (दुचाकी चालक) या पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना वापी येथे नेण्यात आले आहे. तर रमेश कोदे, रसिका कोदे, भास्कर डोकफोडे हे देखील जखमी आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात रिक्षाचं  नुकसान झालं आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या बाजुला केली त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळित झाली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group