सावधान! येत्या काही तासात नाशिकसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिकसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
img
DB
पुढील ३-४ तास  नाशिक, ठाणे आणि पालघर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा  इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नाशिक, ठाणे, पालघरला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज आहे.  पुढील 3-4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमी प्रति तासासोबतच काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज

या सोबतच नगर जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.  पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील ३-४ तास अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील ३-४ तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group