हृदयद्रावक ! काळरात्र ठरली,  इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू
हृदयद्रावक ! काळरात्र ठरली, इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
मंगळवारी रात्री उशिरा विरारमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. येथील नारंगी फाटा परिसरात असलेली रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची ४ मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळल्याची दुर्घटना घडली.या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंब गाडली गेली. या कुटुंबांचे शोधकार्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व वसई विरार महापालिका अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले. 

हे ही वाचा 
नाशिक : फेसबुकवर विवाहितेशी मैत्री, बहाणे देत भामट्याने केले असे काही की...

वीस तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत बचावकार्य दरम्यान १५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ९ जण जखमी सापडले आहेत. ही इमारत १० वर्ष जुनी असून या इमारतीचं शासनाकडून ऑडिट करण्यात आले नव्हते. दरम्यान या घटनेनंतर अद्यापही बचावकार्य सुरु आहे. अजूनही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर प्रशासन कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group