दुर्दैवी! भरधाव फॉर्च्युनरनं प्राध्यापिकेला चिरडलं; उपचारादरम्यान मृत्यू
दुर्दैवी! भरधाव फॉर्च्युनरनं प्राध्यापिकेला चिरडलं; उपचारादरम्यान मृत्यू
img
Dipali Ghadwaje
पालघर : आधी पोर्शे हिट अँड रन, त्यानंतर वरळी हिट अँड रन प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अशातच आता विरारमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. विरारमध्ये एका कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर विरारमध्ये खळबळ माजली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.        

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आत्मजा राजेश कासट असं 46 वर्षीय प्राध्यापिकेचं नाव आहे. आत्मजा कासट उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास आत्मजा या विरार पश्चिम येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन जात होत्या.

हेही वाचा >>>>> "ही" मोठी कंपनी 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

त्यावेळी पाठीमागून आलेल्या टोयोटा फॉर्च्युनर कारनं त्यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. कारचालकानं त्यांना नजिकच्या रुग्णालयात नेलं मात्र  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अर्नाळा सागरी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन,  शुभम पाटील याला अटक केली आहे.    
इतर बातम्या
Join Whatsapp Group