"ही" मोठी कंपनी 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार
img
Dipali Ghadwaje
अमेरिकेची सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनी इंटेलने गुरुवारी सर्वांना हादरा देणारी घोषणा केली आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहे. अशावेळी इंटेलने कामाची घडी बसविण्यासाठी १८ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली आहे.

इंटेलकडे सध्या १.२४ लाख कर्मचारी आहेत. इंटेल ही जगातील सर्वात मोठी कॉम्प्युटर प्रोसेसर बनविणारी कंपनी आहे. या कंपनीने १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देण्याचा निर्णय घेतल्याने आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

इंटेलला कंपनीच्या खर्चात वर्षभरात एकूण २० अब्ज डॉलरची कपाल करायची आहे. नुकत्याच झालेल्या तिमाहीत कंपनीला १.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. इंटेलचे सीईओ पॅट गेलसिंगर यांनी पहिल्या तिमाहीत आम्हाला प्रचंड नुकसान झाले आहे. दुसऱ्या तिमाहीमधील येणारे आकडे आधीच्या तिमाहीपेक्षा जास्त आव्हानात्मक असतील, असे म्हटले आहे. म्हणजेच कंपनीला आणखी मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

एका वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार , इंटेलच्या मुख्य वित्तीय अधिकारी डेविड जिन्सनर यांनी सांगितले की, आम्ही आमच्या खर्चात कपात करत आहोत. फायद्यात वाढ करण्यासाठी आणि बॅलन्स शीट चांगली करण्यासाठी सक्रीय पाऊले उचलली जाणार आहेत.

नुकसानीमुळे कंपनीने इस्रायलमधील नव्या प्रकल्पाची गुंतवणूक रोखली आहे. तिथे १५ अब्ज डॉलर गुंतविले जाणार होते. इंटेलला एनव्हिडीया, एएमडी आणि क्वालकॉम सारख्या कंपन्यांकडून कडवी स्पर्धा मिळत आहे. एआयमध्ये एनव्हिडीया पुढे गेल्याने इंटेलला मोठा फटका बसू लागला आहे.
JOBS | Intel |
इतर बातम्या
Join Whatsapp Group