'या' देशात मिळणार महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार, सरकारनं घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' देशात मिळणार महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार, सरकारनं घेतला 'हा' मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.  राज्यातील तरुणांना जर्मनीत नोकरी देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतलाय. युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करणार आहे.

याबाबत महाराष्ट्र सरकारनं जर्मनीच्या बाडेन वूटेनबर्ग या राज्याशी करार करुन ऐतिहासीक योजना सुरु केलीय. महाराष्ट्रातील कुशल, अकुशल, बेरोजगारांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण आपल्याचं जिल्ह्यात देण्यात येणार आहे. हे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळं राज्यातील तरुणांना जर्मनीत नोकरीच्या संधी मिळणार आहेत. 

राज्यातील तरुणांना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी निवासी प्रशिक्षणाची सोय देखील करण्यात येणार आहे. जर्मनी येथे नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्टसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जर्मनी येथे नोकरी करण्यासाठी सुरुवातीच्या काळात सरकार आवश्यक मदतही करणार आहे. महाराष्ट्राच्या कौशल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवण्यासाठी ही योजना आणणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

जर्मनीत या क्षेत्रात मिळणार संधी?

  • परिचारिका (रुग्णालय)  वैद्यकीय सहाय्यक (एमएफए)
  • प्रयोगशाळा, रेडियोलॉजी, दंतशल्य सहाय्यक
  • आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषा सेवक
  • फिजिओथेरपीस्ट
  • दस्तऐवज आणि संकेतीकरण
  • लेखा व प्रशासन

आतिथ्य सेवांमधील तंत्रज्ञ

  • वेटर्स
  • स्वागत कक्ष संचालक
  • रिसेप्शनिस्ट
  • आचारी
  • हॉटेल व्यवस्थापक
  • लेखापाल
  • हाऊसकीपर
  • क्लीनर

स्थापत्य सेवांमधील तंत्रज्ञ

  • विद्युततंत्री
  • नविनीकरण उर्जेमधील विशेष विद्युततंत्री
  • औष्णिक विजतंत्री
  • रंगारी
  • सुतार
  • वीट फरशीसाठी गवंडी
  • प्लंबर्स नळ जोडणी
  • वाहनांची दुरुस्ती करणारे

विविध तंत्रज्ञ

  • वाहन चालक (बस, ट्रेन, ट्रक)
  • सुरक्षा रक्षक
  • सामान बांधणी व वाहतूक करणारे
  • विमानतळावरील सहाय्यक
  • हाऊसकीपर
  • विक्री सहाय्यक
  • गोदाम सहाय्यक

अशा विविध क्षेत्रात जर्मनीत नोकरीच्या संधी उपलब्ध होमार आहेत. त्यामुळं जर्मनी भाषेचं ज्ञान राज्यातील बेरोजगारांना देण्यात येणार आहे. त्यामुळं तरुणांनी मोठ्या प्रमाणात या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group