मोठी दुर्घटना! 3 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली , बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू ; नेमकं कशी घडली घटना?  वाचा
मोठी दुर्घटना! 3 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली , बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू ; नेमकं कशी घडली घटना? वाचा
img
Dipali Ghadwaje
नवी मुंबई :  मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. नवी मुंबईत एक 3 मजल्यांची बिल्डिंग कोसळली आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची चिंता व्यक्त केली जात होती.   

मात्र, त्यानंतर ढिगाऱ्याखाली दोघे अडकले असून इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाळी अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर, अद्याप एकाचा शोध सुरू आहे.  या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे.

नवी मुंबईतील शहाबाज गावातील 3 मजल्यांची बिल्डिंग पत्त्यासारखी कोसळली आहे. बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस 3 मजली इमारत पहाटे कोसळली. यामध्ये तीन नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत होती. दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. 

बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले मात्र तीन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांना बाहेर काढण्यात आलं असून एकाचा शोध अद्याप सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शी आणि इमारतीतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास बिल्डिंग कोसळली. पत्त्यासारखी बिल्डिंग जमिनदोस्त झाल्याचं पाहायला मिळाली. बिल्डिंगला अगोदर हादरे बसले, त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले. मात्र, दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती मिळाली. 

दुर्घटनेची बातमी मिळताच, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. 

नेमकं घडलं काय? 

बेलापूर सेक्टर 19 शहाबाज गावातील इंदिरा निवास मधील तीन मजली इमारत कोसळली आहे. ही इमारत 2013 मध्ये बांधण्यात आली होती. कोसळलेल्या इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 फ्लॅट्स होते. पहाटे अचानक इमारतीला हादरा बसल्यानंतर नागरिक घाबरून घराबाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत इमारतीत राहणारी 40 लोक आणि 13 मुलं सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. तर, ढिगाऱ्याखालून दोघांना बाहेर काढण्यात आलं आहे. दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप एक व्यक्ती बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे. 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group