धक्कादायक बातमी: घरगुती वाद विकोपाला .... 4 वर्षाच्या मुलीची हत्या करत आईनेही केली आत्महत्या !
धक्कादायक बातमी: घरगुती वाद विकोपाला .... 4 वर्षाच्या मुलीची हत्या करत आईनेही केली आत्महत्या !
img
DB
पालघर येथील डहाणूमध्ये घरगुती वादातून एका महिलेने पोटच्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. ही घटना डहाणू परिसरातील सिसणे गावात घडली. 



याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आपल्या कुटुंबासह कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्यास होते. तर, तिचा पती मच्छीमार तो सतत कुटुंबापासून दूर असायचा. गेल्या अनेक दिवसानंतर रविवारी तो घरी परतला आणि मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले.आपल्याला सोबत नेले नाही म्हणून महिलेला राग अनावर झाला. तिने कशाचाही विचार न करता पोटच्या चार वर्षाच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर घराच्या छताला गळफास लावून स्वत:ही आत्महत्या केली.

शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करत माय-लेकीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविला. महिलेने मुलीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी कासा पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group