समुद्र खवळला! पुढील 24 तास महत्त्वाचे; रत्नागिरीला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबईसाठी......
समुद्र खवळला! पुढील 24 तास महत्त्वाचे; रत्नागिरीला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबईसाठी......
img
Dipali Ghadwaje
रत्नागिरी :  कोकणात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत.

रत्नागिरीत तर 205  मिमीहून अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.  उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणात  अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत.

रायगडच्या समुद्राला उधाण आले आहे. दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होताच. काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर समुद्र आणखी खवळेल असा अंदाजही हवानाम खात्यानं वर्तवला आहे.

दरम्यान, मच्छीमारांना अजिबात समुद्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. 

मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग 50-60  किमी प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. उद्या देखील कोकणात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  मुंबईत आज अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.50-60  किमी प्रति तासाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.  

प्रशासनानकडून सतर्क राहण्याचा इशारा
रायगड जिल्ह्याला साकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. तसंच आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तसंच कोणतीही जीवितहानी घडू नये म्हणून प्रशासन सज्ज झालंय.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी सुरू असून ओरोस, जिजामाता नगर येथील शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group