पावसाचे थैमान....! केदारनाथ मार्गावरून 2500 भाविकांचे रेस्क्यू, दर्शनासाठी गेलेले 'इतके' जण बेपत्ता
पावसाचे थैमान....! केदारनाथ मार्गावरून 2500 भाविकांचे रेस्क्यू, दर्शनासाठी गेलेले 'इतके' जण बेपत्ता
img
Dipali Ghadwaje
केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसानंतर सरकारने बचावकार्य तीव्र केले आहे. केदारनाथ परिसरात अडकलेल्या जवळपास 2537 प्रवाशांचे रेस्क्यू करण्यात येत आहे. SDRF सोबतच लष्कराचे चिनूक आणि MI-17 हेलिकॉप्टरहीही बचाव कार्यासाठी अथवा रेस्क्यू ऑपरेशनसाठी उतरले आहे.

याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता झाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे. कुटुंबीयांचा या लोकांसोबतचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, वायएमएफ, डीडीआरएफ आणि पोलिसांचा चमू देखील बचाव कर्यात आहे.

लिंचोली आणि भिमबली येथे अडकलेल्या लोकांना शेरसी येथे पोहोचवले जात आहे. काही यात्रेकरूंना गौरीकुंडावरून पगडंडी मार्गे सोनप्रयागला आणले जात आहे. गौरीकुंड ते सोनप्रयाग दरम्यानचा जवळपास 100 मीटर भाग उध्वस्त झाला आहे.

डीएम सौरभ गहरवार आणि एसपी विशाखा अशोक भदाणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास बचाव कार्य सुरू झाले आहे. भीमबलीच्या जवळपास अडकलेल्या 737 यात्रेकरुंना हेलीकाप्टरच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. तर 200 यात्रेकरूंना रास्त्याने 
आणण्यात आले आहे.

या अभियानात पाच हेलिकाप्टरचा समावेश आहे. सर्वाधिक यात्रेकरू गौरीकुंडाजवळ अडकलेले आहेत. एसडीआरएफचे कमांडन्ट मणिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीकुंड येथून 1700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी अद्यापही 1300 जण अडकलेले आहेत. अलास्का लाइटच्या मदतीने रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार आहे.

एसडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये 1100 ते 1400 भाविक, लिंचौलीमध्ये 95 तसेच भीमबलीमध्ये जवळपास 150 यात्रेकरू अडकलेले आहेत. याशिवाय, कुमाऊंमध्येही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मंडलमध्ये अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group