नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- जेलरोड, हनुमान नगर येथील रहिवासी आणि नाशिक रोड देवळाली व्यापारी बॅंकेचे कर्मचारी रामदास तुळशीराम चौधरी (वय ४२) यांचे केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले असता हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. चौधरी हे व्यायामपटू तसेच प्रशिक्षक होते. जेलरोडच्या गणेश व्यायमशाळेत ते युवकांना व्यायामाचे प्रशिक्षण द्यायचे. सुमारे वीस वर्षापासून ते बॅंकेत सेवेत होते.
गेल्या आठवड्यात जेलरोडच्या भाविकांसमवेत ते केदारनाथ यात्रेला गेले होते. दर्शनाला जात असताना वाटतेच त्यांचे निधन झाले. गणेश एकता कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळातर्फे अध्यक्ष अजित बने, अरुण वाकचौरे, शाम इंगळे, राजेंद्र वाजे, सुनील मुरकुटे, विलास जाधव, प्रकाश भुसारे आदींनी त्यांना आदरांजली वाहिली.
दरम्यान, दिल्लीहून चौधरी यांचे पार्थिव विमानाने रविवारी (दि.२०) ओझर विमानतळावर आल्यावर जेलरोड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.