नाशिक  : फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून चार जणांची 27 लाखांची फसवणूक
नाशिक : फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून चार जणांची 27 लाखांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून चार जणांची 27 लाखांची फसवणूक करणार्‍या दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विपुल प्रभाकर चव्हाण (रा. शिवशक्ती चौक, नवीन सिडको) हे खासगी नोकरदार आहेत. आरोपी रोहित जांभूळकर व सिद्धार्थ जांभूळकर (दोघेही रा. फाशीच्या डोंगराजवळ, ध्रुवनगर, सातपूर) यांनी कॅनडा कॉर्नर येथे बिझनेस स्क्वेअरमध्ये आरजे ट्रेडर्स नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंगचे सुरू करून ते सेबीकडे रजिस्टर असल्याचे भासवून त्याद्वारे फिर्यादी चव्हाण यांना निर्मल बंग प्रा. लि. कंपनीत फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे आमिष दाखविले.

या कंपनीने बनावट लेटरहेड व बनावट स्टेटमेंट तयार करून वेळोवेळी रोख, एनईएफपी चेकद्वारे फिर्यादीकडून एकूण 17 लाख रुपये स्वीकारले,
तसेच फिर्यादी चव्हाण यांच्या परिचयाचे वैभव शशिकांत भणगे (रा. सावतानगर, सिडको), पद्माकर बागडे (रा. साई संस्कृती, ध्रुवनगर, नाशिक) व शेख शफिक अब्दुल रहिम (रा. पखाल रोड) यांनासुद्धा आरोपी रोहित जांभूळकर व सिद्धार्थ जांभूळकर यांनी फॉरेक्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अनुक्रमे 80 हजार, 4 लाख 32 हजार व 4 लाख 90 हजार असे एकूण 27 लाख 2 हजार रुपये स्वीकारून चार जणांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. 5 सप्टेंबर 2022 ते 15 मार्च 2026 या चार वर्षांच्या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथे घडला.

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group